Teeth | दात स्वच्छ आणि सुंदर हवे असतील तर या गोष्टींचे अतिसेवन टाळाच !
ब्लॅक कॉफी पिण्यावर अनेकांचा भर असतो. दिवसातून बऱ्याच वेळा ब्लॅक कॉफी सेवन केले जाते. पण जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. जवळपास सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. पण जास्त चहा प्यायल्याने दातांची चमक निघून जाते. चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता. हा हर्बल चहा आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Teeth care tips: स्वच्छ, निरोगी दात हवे आहेत का? मग या गोष्टींचे अजिबात करू नका सेवन
Follow us
कधीकधी आपले दात त्यांची नैसर्गिक चमक गमावतात. अनेक वेळा केवळ दातांच्या समस्याच नाही तर चुकीच्या जीवनशैलीमुळेही दात पिवळे होण्याचे प्रमाण वाढते. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आपल्या दातांवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे दात पिवळे पडतात. चला जाणून घेऊया की कोणते पदार्थ आपण जास्त खाणे टाळले पाहिजेत.
ब्लॅक कॉफी पिण्यावर अनेकांचा भर असतो. दिवसातून बऱ्याच वेळा ब्लॅक कॉफी सेवन केले जाते. पण जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.
जवळपास सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. पण जास्त चहा प्यायल्याने दातांची चमक निघून जाते. चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता. हा हर्बल चहा आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
जर तुम्हाला रेड वाईन प्यायला आवडत असेल तर मर्यादित प्रमाणात सेवन करा. त्याचे अतिसेवन दातांसाठी घातक ठरू शकते. त्यात अनेक ऍसिडस् असतात. ते दात खराब करतात.
तंबाखू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याचा दातांवर खूप वाईट परिणाम होतो. धूम्रपान आणि तंबाखू चघळल्याने दातांवर डाग पडू शकतात. यामुळे तंबाखू खाणे टाळाच.