Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्याकिंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.