बरेच लोक वजन वाढते म्हणून शक्यतो तूप खाणे टाळतात. त्यांना असे वाटते की, तूप खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही. होय, देसी तूप खाल्ल्याने तुमचे वजन किंवा चरबी वाढत नाही.
तुपामध्ये असलेले फॅट्स तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय जर तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जेवणात तूप जरूर खा. व्हिटॅमिन एची कमतरता तुपाच्या सेवनाने पूर्ण होते.
ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांना तुपापासून दूर राहण्यास सांगितले जाते. तुपामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते जे तुमच्या शरीराला आतून बरे करते.
आयुर्वेदनुसार तुपामध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात. जे तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करतात. हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहेत.
ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनाही तूप खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही, पण फक्त हे लक्षात ठेवा की ते तूप किती प्रमाणात खाल्ले जात आहे. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)