Skin Care : हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी ‘या’ सुपरफूड्सपासून फेसपॅक तयार करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
हिवाळा म्हटंले की, त्वचेच्या समस्या आल्याच. कोरड्या थंड हवेमुळे त्वचा कोरडी होऊन खाज सुटते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. विविध क्रीम त्वचेसाठी वापरण्यापेक्षा हिवाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजेत.
1 / 5

2 / 5
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी हे फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तुम्ही फेसपॅकसाठी गाजर देखील वापरू शकता. गाजराचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
3 / 5
कोबीमध्ये खनिजे असतात. ते त्वचेसाठीही खूप पोषक आहे. विशेष म्हणजे कोबीमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. कोबी उकळल्यानंतर त्याचे पाणी त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
4 / 5
पालक ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे पालक आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. पालकाचा रस त्वचेला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
5 / 5
टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट असते. यामुळे टोमॅटो आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोचा लगदा तयार करा आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)