
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महिला या दिवसात होणारा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीमधील त्रास कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.

मासिक पाळीमधील त्रास कमी करण्यासाठी आपण गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिल्ले पाहिजे. यामुळे बऱ्याच प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते. मात्र, पाणी अतिगरम नको पाणी हे कोमटच असावे.

एक कप पाण्यात एक चमचा धणे आणि दालचिनी पावडर उकळा. त्यात साखर मिसळा. हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे मासिक पाळीमधील त्रास कमी होण्यास मदत होईल.

मासिक पाळीमध्ये चाॅकलेट खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाॅकलेटमुळे त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच आपला मूडही चांगला राहण्यास मदत होते.

बऱ्याच महिला या मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासमुळे सतत झोपून राहतात. मात्र, असे न करता आपण थोडा वेळ फिरले पाहिजे. मोबाईल आणि टिव्हीवर थोडा वेळ घालवा, यामुळे फ्रेश वाटण्यास मदत होते.