Skin | उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी ही काळजी घ्या आणि तजेलदार त्वचा मिळवा!
उन्हाळ्यात धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर घाण साचते. त्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण क्लिन्झर वापरणे आवश्यक आहे. तुम्ही हायड्रेटिंग क्लीन्सर वापरू शकता. त्वचा स्वच्छ केल्यानंतर फेस टोनरचा वापर करा. उन्हाळ्यात स्किन टोनिंग खूप महत्त्वाचे असते. टोनर त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते.