Health Tips : ब्रश करताना ‘या’ चुका करू नका, अन्यथा दात आणि हिरड्याचे होईल नुकसान !
आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहित आहे की दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे ब्रश करणे खूप महत्वाचे आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रशिंग आणि फ्लोशिंग फार महत्वाचे आहे.
1 / 5
आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहित आहे की दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे ब्रश करणे खूप महत्वाचे आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रशिंग आणि फ्लोशिंग फार महत्वाचे आहे. मात्र, ब्रश करताना आपण काही छोट्या-छोट्या चुका करतो. ज्यामुळे आपल्या दातांना नुकसान देखील होऊ शकते.
2 / 5
बऱ्याच लोकांना सवय असते, वेगाने दात घासण्याची यामुळे आपल्या हिरड्या खराब होऊ शकतात. म्हणून, मऊ ब्रिस्टल्ससह टूथब्रश निवडा जेणेकरून जास्त ब्रश केल्याने आपल्या हिरड्यांना रक्त येणार नाही.
3 / 5
आपण आपला टूथब्रश साधारण 3 महिन्यांनी बदलला पाहिजे. कारण एक ब्रश तीन महिन्यांपेक्षा जास्त वापरणे चुकीचे आहे. ब्रश खराब झाला नाहीतर 3 महिन्यात ब्रश बदला.
4 / 5
2 ते 3 मिनिटे ब्रश करणे चांगले. काही लोक बऱ्याच वेळ ब्रश करतात. मात्र, तेही चुकीचे आहे. कारण जास्त वेळ ब्रश केल्याने हिरड्यांना त्रास होतो.
5 / 5
दिवसातून साधारण दोन वेळा ब्रश करणे चांगले आहे. त्यापेक्षा जास्त वेळा ब्रश करणे टाळा. जास्त ब्रश केल्याने आपल्या दातातून रक्त येण्याची शक्यता असते.