Yellow nails: ‘या’ घरगुती उपायांच्या मदतीने पिवळ्या नखांची समस्या नक्की दूर करा!
एका भांड्यात 4 ते 5 चमचे व्हिनेगर घ्या आणि त्यात कापूस भिजवा. आता हळूहळू भिजवलेला कापूस नखांवर घासायला सुरुवात करा. हे नखांवर सुमारे 10 मिनिटे लावा. व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिड घाण काढून टाकते आणि नखे चमकदार बनवते. एका भांड्यात थोडासा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण कापसाच्या साहाय्याने नखांवर लावा.