अंडीमध्ये ल्युटीन, सिस्टीन आणि व्हिटॅमिन बी 2 सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर रोज एक ते दोन उकडलेली अंडी नक्कीच खा.
गाजर हे डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. कारण त्यात असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांना निरोगी ठेवते. तुम्ही गाजराचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने डोळ्यांचे अनेक प्रकारचे आजार दूर होतात.
आवळा हा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने डोळ्यांनाच नाही तर शरीराच्या अनेक भागांना फायदा होतो.
अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बी6, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि त्याची चवही अप्रतिम असते. एवोकॅडो नियमित खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी उजळते.
संत्रा, द्राक्ष, लिंबू आणि किवी यांसारखी लिंबूवर्गीय फळे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. भरपूर पोषकतत्त्वे असल्याने डॉक्टरही डोळ्यांसाठी त्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.