Weight Loss: चरबी बर्न करण्यासाठी ‘या’ ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा आणि शरीर निरोगी राहा!
बदाम हे सुपरफूड मानले जाते. हे प्रथिने, निरोगी चरबी आणि अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. मात्र, बरेच लोक वजन वाढण्याच्या भितीमुळे बदाम खाणे टाळतात. बदामामध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळ भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये बदामाचा समावेश करा.
-

काजूमध्ये मॅग्नेशियम असते. हे चयापचय चांगले करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. काजू हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जे वजन कमी करण्यास मदत करते.
-
-
मनुके अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. यामध्ये फायबर देखील भरपूर असते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी काम करते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
-
पास्त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. हे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. त्यामुळे ते तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. पिस्त्यामध्ये असलेले प्रोटीन नवीन स्नायू तयार करण्यास मदत करते.
-
-
अक्रोड वजन कमी करण्यास मदत करते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. हे निरोगी वजन राखण्यासाठी काम करते. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्लांट स्टेरॉल आणि जीवनसत्त्वे असतात.