उन्हाळ्याच्या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये काकडी, टरबूज आणि पुदिना हे पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. याशिवाय तुम्ही आहारात सत्तूचाही समावेश करू शकता. ते हरभरा आणि गव्हाच्या पिठापासून बनवले जाते. त्यात भरपूर प्रथिने असतात. सत्तूमध्ये अनेक पोषक घटक असतात.
सत्तूमध्ये फायबर असते. त्यामुळे पोट आणि आतडे निरोगी राहतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये सत्तूचे सेवन करावे.
उन्हाळ्यात बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा धोका वाढतो. सत्तू थंड असते यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. सत्तूचे सेवन केल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.
सत्तूच्या सेवनाने ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. त्यात ऊर्जा वाढवणारे खनिजे असतात. यामध्ये प्रोटीन असते जे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते. यामुळे या हंगामात सत्तूचा आहारात समावेश करा.
सत्तू आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सत्तूचे सेवन केल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.