Food : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये फक्त हे बदल करा!
बहुतेक लोकांची चरबी ओटीपोटात जमा होऊ लागते. शरीराच्या इतर भागांतून चरबी सहज निघत असली तरी पोटाची चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो. एकदा पोटावर चरबी जमा होऊ लागली की, त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावरील चरबी वाढण्याचे मुख्य कारण हे आपली खराब जीवनशैली हेच आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण पोटावरील चरबी नक्कीच कमी करू शकतो.