Stomach health care : पोटाच्या कर्करोगादरम्यान ही लक्षणे शरीरात दिसतात, वेळीच जाणून घ्या आणि सावधान व्हा!
अनेकदा लोकांना मळमळ सारखी समस्या उद्भवते, परंतु जर त्याचा नेहमीच त्रास होत असेल तर चांगले मानले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, या स्थितीत पोटात गाठ असू शकते आणि त्यामुळे उलट्या किंवा मळमळ होत राहते. थकवा हे अनेकदा पोटाच्या कर्करोगाचे लक्षण मानले जाते. लोक थकवा गांभीर्याने घेत नाहीत आणि ते दीर्घकाळ होत राहतो.