Skin Care : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये ‘हे’ घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा!
लिंबू आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू आणि खोबरेल तेलाने त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी टॅन कमी करेल आणि खोबरेल तेल त्याचे पोषण करते. खोबरेल तेल आणि बेकिंग सोडाची पेस्ट टॅनपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.