Sana Malik : सना मलिक यांनी मागितली अजित पवार यांच्या भेटीची वेळ; नवाब मलिक यांची पुढची राजकीय भूमिका काय?

Nawab Malik Daughter Sana Malik Meet to Ajit Pawar : नवाब मलिक यांची लेक सना मलिक मंत्रालयात; अजित पवार यांच्याकडे मागितली भेटीची वेळ, राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय घडतंय? नवाब मलिक यांची पुढची राजकीय भूमिका काय? वाचा सविस्तर...

Sana Malik : सना मलिक यांनी मागितली अजित पवार यांच्या भेटीची वेळ; नवाब मलिक यांची पुढची राजकीय भूमिका काय?
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 1:25 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक हे नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. ते दोन महिन्यांच्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच नवाब मलिक यांची कन्या सना मलिक सध्या मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा मेसेज घेऊन सना मलिक अजित पवारांच्या भेटीला गेल्या आहेत का? अशी चर्चा सध्या होत आहे.

नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांना मानणारे नेते त्यांच्यासोबत राहिले. अशात नवाब मलिक यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सना मलिक यांनी अजित पवारांच्या भेटीसाठी वेळ मागणं हा चर्चेचा विषय बनला आहे.

दोन महिन्यांचा जामीन

नवाब मलिक सध्या दोन महिन्याच्या जामीनावर आहेत. त्यांच्या प्रकृती व्यवस्थित नसल्याने ते जामीनावर बाहेर आहेत. दोन महिन्यांचा त्यांचा जामीन आहे. हे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक यांना पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.

भूमिका गुलदस्त्यात

दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी भेट घेतली. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मलिकांच्या घरी जात भेट घेतली आहे. तर आमदार रोहित पवार यांनीही नुकतीच मलिकांची भेट घेतली. मात्र नवाब मलिक यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

नवाब मलिक यांना दिलासा

नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी न्यायालयाकडून त्यांना वाढीव एक महिन्यांची मुदत मिळाली आहे. 14 ऑगस्ट ला नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. दोन महिन्यांसाठी ते जामीनावर आहेत. त्यानंतर आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.