शरीराची लवचिकता आणि संतुलन सुधारण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!
नौकासन करण्यासाठी जमिनीवर बसा आणि पाय तुमच्या समोर सरळ करा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तुमचे हात पुढे करा. तुमचे गुडघे वाकवा आणि किंचित मागे झुका. आता श्वास घेताना दोन्ही पाय वर करून हात पुढे करा. आपल्या पायाची बोटं डोळ्यांसमोर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ करा. 5 ते 10 सेकंद या आसनात राहा.