Skin care tips: चमकदार त्वचा हवी आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की फाॅलो करा!
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
1 / 5
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या तर त्वचेच्या या समस्या दूर होण्यास मदत होते.
2 / 5
सकाळी उठल्याबरोबर चेहरा स्वच्छ करा आणि शक्यतो फेसवॉश वापरा. झोपेतून उठल्याबरोबर चेहरा फेसवाॅशने धुतल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते.
3 / 5
सकाळी उठल्याबरोबर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या. यामुळे त्वचेची खोल-स्वच्छता होते. वाफ घेतल्याने त्वचेवर चांगली चमक येते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात.
4 / 5
वाफेनंतर लगेच त्वचेची मालिश करण्यास विसरू नका. वाफ घेतल्यावर लगेचच आपल्या त्वचेची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरणही सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला चांगला मसाज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑलिव्ह ऑईलचीही मदत घेऊ शकता.
5 / 5
हिवाळ्यामध्ये सकाळी कोरफड जेल देखील त्वचेला लावणे फायदेशीर आहे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)