Papaya Face Pack : ग्लोईंग स्किनसाठी पपईचे ‘हे’ फेसपॅक वापरा!
पपई आपल्या त्वचेसाठी एक सुपरफूड मानली जाते. चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी पपई फायदेशीर आहे. आपण घरचे-घरी पपईचे काही फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावू शकतो.
1 / 5
पपई आपल्या त्वचेसाठी एक सुपरफूड मानली जाते. चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी पपई फायदेशीर आहे. आपण घरचे-घरी पपईचे काही फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावू शकतो.
2 / 5
विशेष म्हणजे पपईच्या या फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील, मुरूम, पिंपल्स आणि सुरकुत्या जाण्यास मदत होते. हे फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत.
3 / 5
दुधामध्ये एक्सफोलीएटिंग गुणधर्म आहेत. पपईसह ते आपली त्वचा चमकदार बनवतात. हे डाग कमी करण्यास मदत करते. हा फेसपॅक करण्यासाठी आपल्याला चार चमचे दूध आणि दोन चमचे पपईचा गर लागणार आहे. याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.
4 / 5
चेहऱ्यावरील सन-टॅन काढण्यासाठी तीन चमचे पपईचा गर आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून घ्या. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवा.
5 / 5
चार चमचे पपईचा गर घ्या आणि त्यामध्ये तीन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. हे चांगले एकजीव करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.