त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू खूप गुणकारी मानले जाते. 3 चमचे लिंबाच्या रसामध्ये थोडी साखर मिसळा आणि सुमारे 7 ते 10 मिनिटे अंडरआर्म्सवर लावा आणि मसाज करा.
त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दही यांचा पॅक हळद घालून लावा. 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.
त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर मानला जातो. बटाट्याचा रस अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणाची समस्या दूर होण्यास मदत होते.
ओट्स आणि मधाचा वापर त्वचा चमकदार करण्यासाठी केला जातो. तुम्हाला फक्त ओट्स मधात मिसळून अंडरआर्म्सवर स्क्रब करायचे आहे. काही वेळाने स्वच्छ धुवा.
लिंबू आणि मध एकत्र मिसळा आणि सुमारे 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म्सवर राहू द्या. टीप: धुताना गरम पाणी वापरू नका. सामान्य पाण्याने धुणे चांगले मानले जाते.(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)