कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येने हैराण आहात? मग हे घरगुती हेअर मास्क वापरून पाहा!
हवेतील ओलावा, थंड वारा, कडक सूर्यप्रकाश आणि इतर अनेक कारणांमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या केसांना आणि टाळूला नियमित तेल लावू शकता. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि फळांचा आहारात समावेश करा. याशिवाय केसांना हायड्रेट करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क वापरू शकता.
1 / 5
हवेतील ओलावा, थंड वारा, कडक सूर्यप्रकाश आणि इतर अनेक कारणांमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या केसांना आणि टाळूला नियमित तेल लावू शकता. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि फळांचा आहारात समावेश करा. याशिवाय केसांना हायड्रेट करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल. विशेष म्हणजे घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने तुम्ही हेअर मास्क घरी तयार करू शकता.
2 / 5
स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे केसांची काळजी घेण्यासाठी खूप चांगले आणि प्रभावी मानले जातात. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता. केसांसाठी याचा वापर फार कमी लोकांना माहिती आहे. कढीपत्त्याच्या मदतीने केसांच्या समस्यांवर उपचार करू शकता.
3 / 5
मध आणि खोबरेल तेल तुमचे केस हायड्रेट करतात. केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. गरजेनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात सुमारे दोन चमचे मध घाला. चांगले मिसळा आणि केसांना लावा. या हेअर मास्कमुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
4 / 5
घरच्या घरी नैसर्गिक मास्क बनवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कोरफड जेल मिक्स करू शकता. हे दोन्ही समान प्रमाणात घ्या आणि पेस्ट होईपर्यंत चांगले मिसळा. ते मुळापासून टोकापर्यंत चांगले लावा. कमीतकमी 30 मिनिटे ठेवा आणि आपले केस धुवा.
5 / 5
दही आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामध्ये तेल व्यवस्थित मिसळून ते हेअर मास्क आपण तयार करू शकतो. दही आणि तेलाची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर अर्धा तासांनी आपले केस धुवा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.