वजन कमी करण्यासाठी जिममध्ये व्यायाम करत आहात आणि आहाराकडेही विशेष लक्ष देत आहात. मात्र, तरीही वाढलेले वजन कमी होत नाही अशी अनेकांनी ओरड कायमच असते. मात्र, वजन कमी करण्यासाठी आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या तरीही आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये किमान दोन हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फळांची देखील मुख्य भूमिका असते. वजन कमी करण्यासाठी फळ खावीत. मात्र, फळांचा रस घेणे टाळा. हंगामी फळे वजन कमी करण्यास मदत करतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज रात्री जेवण झाल्यानंतर थोड्यावेळ फिरा. यामुळे वजन झपाट्याने कमी होते. आपण खाल्ले अन्न पचण्यास देखील मदत होते.
वजन वाढण्यात गोड पदार्थ कारणीभूत असतात. यामुळेच ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. अशांनी आपल्या आहारामध्ये अजिबात गोड पदार्थांचा समावेश करू नये.