टीव्ही अभिनेत्री अमृता पवार नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अमृता अदितीची भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री अमृता पवारने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. इन्स्ट्राग्रामवर तिने आपल्या या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री अमृताने लग्नाच्या फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत . एक पाऊल पुढे…,हे कॅप्शन दिले आहे.
काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सभारंभा पार पडला होता. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळत होते.
अभिनेत्री अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.