प्रत्येकाला परफेक्ट बॉडी हवी असते आणि त्यासाठी भरपूर मेहनतही घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्ती त्यासाठी मेहनत करत असते.अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणत्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.
तो सोशल मीडियावर अनेकदा वर्कआऊट सेशनचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते असणं साहाजिक आहे.
मिलिंद सोमणत्याच्या फिटनेस आणि लूक्समुळे आजही मुलींमध्ये त्याचं प्रचंड क्रेझ आहे. आता त्यानं बागेत वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो हँगिंग एक्सरसाइज करताना दिसत आहे.
मिलिंद आपल्या वर्कआऊट आणि डाएटवर विशेष लक्ष देतो त्यामुळेच ही परफेक्ट बॉडी तो मेन्टेन करतो.
वयाच्या 54 व्या वर्षी देखिल तो रोज रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग न विसरता करतो.
मिलिंदचे अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल रेकॉर्ड आहेत. जसे 30 दिवसांत 1,500 किमी चालण्याचा लिम्का रेकॉर्ड, 15 तास 19 मिनिटांत 'आयर्नमैन' चॅलेंज पूर्ण करण्याचा रेकॉर्ड.