Marathi News Latest news Mns chief raj thackeray meet governor bhagat singh koshiyari at mumbai raj bhavan
PHOTO : राज ठाकरे पहिल्यांदाच राजभवनावर, राज्यपाल कोश्यारींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. (Raj Thackeray Meet Bhagat Singh Koshiyari At Raj Bhavan)
Follow us
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, पैसा नाही तरीही लोकांची वीजबिलं चार-पाच पट आली आहेत, त्या बिलांच्या कपातीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.
या भेटीकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले. तसंच राज्यपालही या भेटीसाठी उत्सुक होते असं दिसतंय.“हमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र के राज के दर्शन नही हुए”, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज ठाकरेंना म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे ही सकाळी 10.30 वाजता ही भेट झाली. या भेटीत वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा झाली.
raj thackeray
राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले.