घर विकेन, रस्त्यावर काम करेन पण.. 49 वर्षीय अभिनेत्याचं आश्चर्यकारक विधान

"दुसऱ्याकडे काम मागणं ही माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही. पण तरीही मी ते करणार नाही," असंही त्याने स्पष्ट केलं. नवाजुद्दीनने नुकतंच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सैलेश कोलानु यांच्या 'सैंधव' चित्रपटात त्याने विकास मलिक या बिझनेसमनची भूमिका साकारली आहे.

| Updated on: Jan 29, 2024 | 2:04 PM
हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहे, जे इंडस्ट्रीतील हिरोच्या मापदंडानुसार दिसायला हँडसम नसले तरी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी असाच एक अभिनेता आहे.

1 / 5
नवाजुद्दीनने गँग्स ऑफ वासेपूर, द लंचबॉक्स, बदलापूर, बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन अभिनयाप्रती असलेल्या प्रेमाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

2 / 5
या मुलाखतीत नवाजुद्दीनने म्हटलंय की "माझी संपत्ती, घर सर्वकाही विकेन पण दुसऱ्यांकडे कधी काम मागायला जाणार नाही." जेव्हा चित्रपटांचे ऑफर्स यायला बंद होतील किंवा हाती काम नसेल तेव्हा काय करणार, असा प्रश्न विचारला असता नवाजुद्दीनने हे उत्तर दिलं.

3 / 5
तो पुढे म्हणाला, "असा दिवस जर कधी आला जेव्हा माझ्या हाती कोणतंच काम नसेल, तेव्हा दुसऱ्याकडे जाऊन काम मागण्याची ताकदही माझ्यात येणार नाही. मी तुमच्याकडे येऊन असं बोलूच शकणार नाही की मला काम द्या. त्यापेक्षा मी माझं घर विकेन, माझे शूज विकेन. माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती विकेन आणि त्यातून मी स्वत:चा चित्रपट बनवेन."

4 / 5
"अभिनयाप्रती असलेल्या प्रेमाविषयी मला खूप विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यात कोणाकडे हात पसरू शकत नाही. माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा आहे पण केवळ चित्रपटातीलच अभिनय नाही. मी तो अभिनय रस्त्यावर, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये कुठेही करेन. पण दुसऱ्याकडे कामासाठी हात पसरणार नाही", असं त्याने बोलून दाखवलं.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.