लवकरच अभिनेता हेमंत ढोमे ‘झिम्मा’ हा चित्रपट घेऊन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात भली मोठी लेडीज गँग झळकणार आहे. याच निमित्त सध्या हेमंतनं ‘#माझी झिम्मा ट्रीप’ हे हॅशटॅग सुरू केलं आहे. आणि त्याच्या झिम्मा ट्रीपचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
अशात क्षितीसुद्धा मागे नव्हती तिनंसुद्धा तिच्या झिम्मा ट्रीपच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
तर समीर विद्वंस यांनीसुद्धा त्यांच्या UK ट्रीपच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिनंसुद्धा काही आठवणी शेअर केल्या आहेत.
‘चला.. एकमेकांना सांगूया आपल्या झिम्मा ट्रिप बद्दल! शेअर करा तुमच्या आठवणी... नेमक्या शब्दात!’ असं हे काँटेस्ट आहे शिवाय यामध्ये कुणीही सहभाग नोंदवू शकतो. जो जिंकेल त्याला गिफ्टही मिळणार आहे.