PHOTOS : म्यानमारमध्ये आधी महिलाचे कपड़े आणि कचऱ्याचा वापर, आता अंड्यांमधून सैन्याचा विरोध
म्यानमारमध्ये सैन्याच्या अत्याचाविरोधात (Myanmar Protests Deaths) नागरिकांचा संघर्ष सुरुच आहे. आंदोलन दडपण्याचा अनेकदा प्रयत्न होऊनही म्यानमारचे नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपला विरोध दाखवत आहेत.
म्यानमारमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये तणाव निर्माण झाला.
Follow us
म्यानमारमध्ये सैन्याच्या अत्याचाविरोधात (Myanmar Protests Deaths) नागरिकांचा संघर्ष सुरुच आहे. आतापर्यंत सैन्याने 557 लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. आंदोलन दडपण्याचा अनेकदा प्रयत्न होऊनही म्यानमारचे नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपला विरोध दाखवत आहेत.
आधी महिलांचे कपडे आणि कचऱ्यानंतर आता आंदोलकांनी अंड्यांचा वापर केलाय.
आंदोलकांनी ईस्टरच्या पार्श्वभूमीवर अंड्यांना रंग देत आपला विरोध दर्शवला आहे (Myanmar Protests Background).
यावेळी आंदोलकांनी रंगीबेरंगी अंड्यांवर वेगवेगळे संदेश लिहिले आहेत (Myanmar Protests Against Military Coup). यात सैन्याला प्रखर विरोध करणाऱ्या घोषणांचा समावेश आहे. म्यानमारचं सर्वात मोठं शहर यांगूनमध्ये हे अंड्यांसह आंदोलन झालेलं दिसलं.
म्यानमारमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये तणाव निर्माण झाला.
निवडणुकीत आंग सान सू की यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीचा (National League for Democracy) विजय झाला होता. मात्र, सैन्याने निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप केला