PHOTOS : कोब्रापेक्षाही अधिक विषारी झाड, फक्त स्पर्श केला तरी मृत्यू होऊ शकतो, काय आहे प्रकार?
निसर्गात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि झाडं आढळतात. मात्र यापैकी काही झाडं खूप धोकादायक देखील असतात. अशाच काही मोजक्या जीवघेण्या झाडांपैकी एक म्हणजे जाइंट होगवीड. या झाडाला किलर ट्री म्हणूनही ओळखलं जातं.
Follow us

होगवीड हे झाड न्यूयॉर्क, पेंनसेल्वेनिया, ओहियो, मेरीलँड, वाशिंग्टन, मिशिगन आणि हेम्पशायरमध्ये आढळतं. या झाडाला केवळ स्पर्श केला तरी हातला खाज आणि प्रचंड सूज येते. हातची अवस्था अगदी जखमी स्वरुपाची होऊन जाते.
या झाडाला स्पर्श केल्यानंतर केवळ 48 तासात याचं विष संपूर्ण शरीरात पसरतं. त्यामुळे अशा व्यक्तीला बरं व्हायला अनेक वर्षे लागतात. यात जीव जाण्याचाही धोका असतो.
या झाडातील विष सापांपेक्षाही विषारी असल्याचं मत काही संशोधकांनी व्यक्त केलंय. जर या झाडाला स्पर्श केला तर काही क्षणातच त्वचा जळण्यास सुरुवात होते.
हे झाड इतकं विषारी असण्याचं कारण म्हणजे या झाडातील सेंसआईजिंग फूरानोकॉमारिंस नावाचं रसायन. या रसायनामुळेच हे झाड इतकं धोकादायक असतं. निसर्गात ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन ठेवण्यात या झाडाची महत्त्वाची भूमिका असते, असंही संशोधकांनी नमूद केलंय.