भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पूजा चव्हाण आत्महत्येच्या तपासाची माहिती घेण्यासाठी वाघ पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.
चित्रा वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस हे रक्षक नसून भक्षक असल्याचा आरोप केला. वानवडी पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्यात बाचाबाची झाली.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.
पुणे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी का केली नाही. संजय राठोडांची चौकशी का झाली नाही. राठोडांच्या चौकशीशिवाय पोलिसांनी अहवाल कसा बनवला, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ यांची पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची