त्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपच्या तिकीटावर मुक्ताईनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी येथे मोठी प्रचारमोहीम राबवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते. याच कारणामुळे पुढच्या वेळी रोहिणी खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.