Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची पॉवरफुल पर्सनॅलिटी आहे. त्या सर्वात फेमस आणि ताकदवर महिलांपैकी एक आहेत.
giorgia meloni
Follow us
इटलीमध्ये G7 देशांची परिषद सुरु आहे. ही परिषद इटलीमध्ये असली, तरी त्या देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भारतात चर्चा आहे. सोशल मीडियावर मेलोनी यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होतायत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सौंदर्यासमोर हॉलिवूडच्या भल्या-भल्या अभिनेत्री सुद्धा फिक्या आहेत. ब्युटी आणि फिटनेसमध्ये त्या अभिनेत्रींना टक्कर देतात.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असतात. नेहमीच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देत असतात.
जॉर्जिया मेलोनी कामासोबतच आपला उत्तम फॅशन सेन्स, ब्युटी आणि फिटनेसमुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यांचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा आहे. ऑफिशियल आऊटफिट्स शिवाय स्टनिंग लुक्समध्ये दिसतात.
जॉर्जिया मेलोनी या त्यांच्या साधेपणाने लक्ष वेधून घेतात. सिंपल कॅजुअल लूक्समध्ये सुद्धा त्या सुंदर दिसतात. फॅन फॉलोइंगमध्ये सुद्धा त्या स्टार्सना टक्कर देतात. इंस्टावर त्यांचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.