मणिपूरमध्ये मागच्या कित्येक दिवसांपासून मणिपूर धगधगतं आहे. याच धगधगत्या मणिपूरला राहुल गांधी यांनी भेट दिली.
मणिपूरच्या मोइरांग भागात जात राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांच्याशी बोलताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. हिंसाचाराचे प्रसंग आठवताच स्थानिकांच्या डोळ्यात पाणी आलं
शाळकरी मुलांच्या हातात आम्हाला आम्हाला पुन्हा आमच्या घरी, शाळेत जायचं आहे, असे पोस्टर्स पाहायला मिळाले.
काही महिलांनी वेलकम राहुल गांधी हा फलक हातात घेत राहुल गांधी यांचं स्वागत केलं.
मोइरांग भागातील लोकांच्या समस्या राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या. काहींनी लेखी स्वरूपातही आपल्या तक्रारी मांडल्या.