काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेदरम्यानचा कन्हैया कुमारचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पसमोर कन्हैया यांनी फोटो काढला आहे. यात बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात संविधान आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेश आहे. या यात्रेदरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असणाऱ्या महू इथे जाऊन कन्हैया यांनी अभिवादन केलं.
इथे त्यांनी बुद्धांच्या मूर्तीलाही नमन केलं.
आंबेडकरांची जन्मभूमी असलेल्या महू इथले फोटो कन्हैया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.