राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे कार्यकर्ते शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित आहेत.
आमदार रोहित पवारदेखील शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रवादी फक्त साहेबांची असं म्हणत मुंबईत पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सची सध्या चर्चा होत आहे.