भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
माझ्या वाढदिनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन. यासाठी आपण जिथे आहात, तिथून शुभेच्छा द्या. त्या माझ्यापर्यंत पोहोचतील, असं पंकजा मुडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे त्यांचा मुलगा आर्यमनसोबत तिरुपती इथं श्रीकालहस्तीच्या दर्शनासाठी गेल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते भगवान गडावर गेले होते. तिथला फोटो शेअर करत 'माझ्यासाठी ही अनमोल भेट', असं पंकजा मुंडे म्हणल्या.