Narendra Modi Style : …म्हणून नरेंद्र मोदींना स्टाईल आयकॉनही म्हटलं जातं! पाहा मोदींचे 6 स्टाईलिश फोटो

नरेंद्र मोदींकडे एक स्टाईल आयकॉन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच ते आपल्या वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेन्टमुळेही चर्चेत राहिलेले आहेत. आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्टाईलिश अंदाजाचा घेतलेला हा खास आढावा....

| Updated on: Sep 17, 2022 | 2:03 PM
नरेंद्र मोदी!, हे नाव सगळ्यांसाठीच परिचयाचं झालेलंय. भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून ते आतापर्यंत... जगभरात नरेंद्र मोदी हे नाव कानाकोपऱ्यात पोहोचलंय. हे नाव प्रसिद्ध होण्यामागे नरेंद्र मोदी यांच्या कामाचा आवाका, त्यांची राजकीय कारकीर्द तर आहेच. पण यासोबत एक स्टाईल आयकॉन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच ते आपल्या वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेन्टमुळेही चर्चेत राहिलेले आहेत. आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्टाईलिश अंदाजाचा घेतलेला हा खास आढावा....

1 / 6
कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपण अनेकदा पाहिलं आहे. नेहरु जॅकेटचं नावंही गेल्या काही वर्षात मोदी जॅकेट झाल्याचे किस्सेही तुम्ही ऐकले असतील. हे जॅकेट नरेंद्र मोदी यांना शोभूनही दिसतं. नेहरु जॅकेट नरेंद्र मोदी यांचं फेव्हरेट स्टाईल स्टेटमेन्ट आहे. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी यांचा हुबेहूब पुतळा साकारला गेला होता, तेव्हा तो देखील याच खास अंदाजात साकारण्यात आलेला होता.

2 / 6
भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असा देश आहे. याच संस्कृतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानही आहेच. हाच अभिमान आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या पेहरावातही दिसून येतो. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात, तेव्हा तेव्हा ते वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव आणि त्या संस्कृतीची ओळख यांचे दाखले द्यायला विसरत नाहीत. महाराष्ट्राच्या या पगडीसोबत असलेला मोदींचा हा लूक तेच अधोरेखित करतोय.

3 / 6
भारतीय पोशाखच नाही, तर वेस्टर्न आऊटफिटमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास लूक आणि त्याचेही अनेक फोटो अनेकदा समोर आले आहेत. विदेश दौऱ्यादरम्यान सफारी सूट, नॉर्मल सूट, फॉरमल लूकमध्येही मोदींचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालंय. या लुकमध्येही नरेंद्र मोदींची स्टाईल ही दखल घेण्यासारखीच असल्याचं दिसून आलंय. हा फोटो त्याचाच दाखला देतोय...

4 / 6
नरेंद्र मोदी यांची धार्मिकता अनेकदा चर्चेचा विषय बनते. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, विधी, पूजा मोदींच्या हस्ते पार पडल्यात. देशभरातील विविध अध्यात्मिक स्थळांना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भेटीच्या बातम्या तर होतातच. पण या भेटीदरम्यान, नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला पोशाखही तितकाच चर्चेत असतो. केदरनाथ यात्रेवेळी नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील स्थानिक पेहराव परिधान करण्याला प्राधान्य दिलं होतं. उत्तराखंडमधील लोकांप्रमाणेच मोदींनीही एका लॉन्ग कुर्त्यासह आणि एक पारंपरिक टोपी परिधान केली होती.

5 / 6
शाल ही नरेंद्र मोदींसाठी एक विशेष स्टाईल आयकॉन ठरली आहे. नरेंद्र मोदी हे नेहमीच शाल वापरताना दिसत नाही. कधीतरीच त्यांनी शाल परिधान केल्याचं दिसतं. पण जेव्हा ते शाल परिधान करतात, तेव्हा त्यांची स्टाईल ही त्यांच्या इतर फॅशनपेक्षा अधिक हटके असल्याचंही फोटोंमधून दिसून आलंय.

6 / 6
Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.