पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचं निधन झालंय. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नरेंद्र मोदी आपल्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.
आपल्या आई प्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे पाय धुतले त्याचा हा फोटो....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आई हीराबेन मोदी यांच्या समवेत...
आई हीराबेन यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेताना नरेंद्र मोदी...
"शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से... असा संदेश आईने कायम दिला", असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आईसोबतच्या आठवणी जागवल्या...