मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत एका नव्या प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
येत्या 30 नोव्हेंबरपासून एक नवी मालिका 'सोनी मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं नाव आहे 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'.
या शोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या नव्या इनिंगसाठी ती सज्ज झाली आहे. या शोचा प्रोमोसुद्धा तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटोशूट ती शेअर करत असते.