‘पुष्पा 2’च्या ट्रेलरमध्ये दिसलेला भयानक पुरुष कोण? श्रीवल्लीच्या हत्येशी कनेक्शन?

'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेलरमधल्या एका भूमिकेनं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. ही भूमिका कोणाची आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

| Updated on: Nov 19, 2024 | 10:58 AM
अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये अनेक भूमिका पहायला मिळाल्या, मात्र एका भूमिकेनं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.

1 / 10
ट्रेलरमध्ये जेव्हा 'गंगम्मा जत्रा'चा सीन दाखवला जातो, तेव्हा त्यात एक अल्लू अर्जुनशिवाय आणखी एक व्यक्ती विचित्र वेशात दिसून येते. त्या भूमिकेची झलक अवघ्या काही सेकंदांची आहे, मात्र त्यातही ती आवर्जून लक्ष वेधून घेते.

2 / 10
अर्ध टक्कल, गळ्यात चप्पलांची माळ, कपाळावर मोठा गंध, भुवयांवर गंध, कानात झुमके, अर्ध्या चेहऱ्यावर फासलेला काळा रंग आणि अर्ध्या चेहऱ्यावर लाल रंग, नाकात दागिना.. असा विचित्र आणि कल्पनेपलीकडचा हा लूक आहे. या मेकअपमध्ये ही भूमिका खूपच भयंकर वाटते.

3 / 10
'पुष्पा 2'चा ट्रेलर पाहिल्यापासून अनेकांच्या डोक्यातून ही भूमिका जात नाहीये. ही व्यक्तीरेखा नेमकी कोणी साकारली आहे, तो अभिनेता कोण आहे याविषयी नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

4 / 10
ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय की तेलुगू अभिनेता श्रीतेजने ही भूमिका साकारली आहे. 'पुष्पा 1'च्या कथेत पुष्पा राजचे दोन सावत्र भाऊ होते. त्यापैकी मोठ्या भावाने त्याच्या लग्नात मोठा गोंधळ घातला होता.

5 / 10
'पुष्पा 2'च्या ट्रेलरमध्ये दिसणारी ही भयंकर भूमिका पुष्पाराजच्या दुसऱ्या छोट्या भावाची आहे. या भूमिकेचं नाव मोलेटी धर्म राज असं आहे. अभिनेता श्रीतेजने ही भूमिका साकारली आहे.

6 / 10
श्रीतेजचा हा भयंकर अवतार चित्रपटातील 'गंगम्मा तल्ली जत्रा'च्या सीक्वेन्सचा एक भाग आहे. या सीक्वेन्समध्ये अल्लू अर्जुनसुद्धा विचित्र अवतारात दिसणार आहे. त्याचा पोस्टर याआधी शेअर करण्यात आला होता. गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुपतीमधील प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते. अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रुप धारण करतात. गंगम्मा तल्ली म्हणजेच गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी मानली जाते.

7 / 10
श्रीतेजचं या सीक्वेन्समध्ये राक्षसी वेशात दाखवणं म्हणजे कथेत तो कदाचित पुष्पाराजची पत्नी श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) हिच्यासोबत काहीतरी वाईट करणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळेच पुष्पाराज आणि त्याच्यात तुफान हाणामारी दाखवली जाऊ शकते.

8 / 10
काही महिन्यांपूर्वी 'पुष्पा 2'च्या सेटवरील रश्मिकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात श्रीवल्लीला मृतावस्थेत दाखवलं गेलं होतं. त्यामुळे धर्मराजच्या हातून श्रीवल्लीची हत्या होणार का, असा सवाल नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

9 / 10
श्रीतेजने 2013 मध्ये अभिनयात पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर आंध्रप्रदेशचे दोन मुख्यमंत्री वायएस राजा शेखर रेड्डी आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.