चाळीसगावात चिमुकल्यांनीअनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केल्याची सगळीकडं चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांचे फोटो सुध्दा सगळीकडे व्हायरल झाले आहेत. शाळेतील मैदानात हा उत्सव साजरा झाला.
चाळीसगावातील व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात शिक्षकांनी या उत्सवाचं नियोजन केलं होतं. साधारण २०० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. मुलींनी मुलांना राखी बांधली तर मुलांनी त्यांना गोड भेट दिली. यावेळी सगळे शिक्षक शाळेत उपस्थित होते.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक विद्यार्थी एका विद्यार्थीनीला भेटवस्तू देत आहे.
एक विद्यार्थींनी एका विद्यार्थ्याला ओवाळत आहे. त्यावेळी सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत आहेत. त्याचबरोबर फोटो शिक्षक सुध्दा दिसत आहेत. विशेष म्हणजे एका कोपऱ्याला राखी बांधणी सुरु आहे.
महाराष्ट्रात सगळीकडं आज रक्षाबंधन उत्साहात सुरु आहे, आज रक्षाबंधन असल्यामुळे सगळीकडं लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारात खरेदीसाठी बहिणीची मोठी गर्दी झाली आहे.