पद्मविभूषण मा. श्री. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. यावेळी श्री. रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा ''उद्योगरत्न" पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल उद्योजकांचा यावर्षीपासून 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार'ने सन्मान करण्यात येणार आहे.
पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला,उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर
२० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांना 'उद्योगरत्न' पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद साधला.