नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत.
महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.
शिळावर्तुळ ,शिळास्तम्भ,शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.
महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली.
या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे. ही संपुर्ण माहिती नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पाठवली आहे.