देशातील मोठी सुरक्षा संस्था सीआयएसएफने आपल्या सेवेतील सात कुत्र्यांची निवृत्ती (CISF Dogs retirnment) केली. या निवृत्ती दरम्यान त्यांनी मोठ्या पार्टीचं आयोजन केले होते. निवृत्ती झालेल्या कुत्र्यांना (CISF Dogs retirnment) पेस्ट्री खायला घालून, गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी सीआयएसएफचे अनेक अधिकारीही उपस्थित होते.
हा कार्यक्रम सीआयएसएफच्या शास्त्री पार्क, दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. हे सात कुत्रे वेगवेगळ्या जातीचे आहेत. तसेच गेल्या दहा वर्षापासून ते सीआयएसएफसाठी काम करत होते. त्यांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना दिल्लीच्या एका जंगपुरा येथील एनजीओकडे देण्यात आले आहे. यापूढे ही एनजीओ या कुत्र्यांची देखभाल करणार आहे.
सीआयएसएफजवळ 60 वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे आहेत. हे कुत्रे मॉक ड्रिल आणि शोधकार्याच्या अभियानात जवनांना मदत करतात.
या कुत्र्यांच्या निवृत्ती दरम्यान तेथे उपस्थित असलेले जवान भावूक झाले. तसेच त्यांनी या कुत्र्यांसोबत एक सेल्फीही घेतला.
हीना (फीमेल,लॅब्रा डॉग), वीर (मेल, कॉकर स्पनिएल्स), किते (फीमेल, लॅब्रा डॉग), जेली (फीमेल, लॅब्रा डॉग), जेसी (फीमेल, जर्मन शेफर्ड), लूसी (फीमेल, लॅब्रा डॉग), लवली (फीमेल, लॅब्रा डॉग), अशी या सात निवृत्ती झालेल्या कुत्र्यांची नावं आहेत.
पहिल्यांदा आम्ही डॉग स्क्वॉडसोबत सात कुत्र्यांना निवृत्ती दरम्यान सन्मानीत केले. निवृत्तीनंतर आता बाकीचे आयुष्य हे कुत्रे एनजीओमध्ये राहतील. तसेच प्रत्येक महिन्याला एक-दोन लोक या कुत्र्यांना पाहण्यासाठी एनजीओमध्ये जाईल, असं सीआयएसएफचे डेप्युटी कमांडेट रमन कुमार यांनी सांगितले.