Shivsena bhavan Photo:शिवसेनाभवनवर पुन्हा भगवे वादळ; हिंगोलीतील निष्ठावान शिवसैनिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचा आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर बंडखोरांवर कारवाईचे संकेत दिलेले असताना काल हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जो हिंदू की बात करेगा, वोही देशपर राज करेगा अशी घोषणा देत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हे शक्तीप्रदर्शनच नाट्य सुरू असतानाच दुसरीकडे मात्र हिंगोलीतीलच असंख्य शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनवर येऊन भेट घेतली. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Most Read Stories