PHOTO : 70 किलो वजन, तीन फूट लांब, मालवणमध्ये भरतगड किल्ल्याच्या पायथ्याची आढळली तोफ
नुकतंच मालवण येथील भरतगड किल्ल्याच्या पायथ्याशी उत्खनन करताना तोफ आढळून आली आहे. (Malvan Bharatgad fort Cannon Found)
Follow us
मालवण येथील मसुरे गावात पुन्हा ऐतिहासिक पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.
मालवण येथील भरतगड किल्ल्याच्या पायथ्याशी उत्खनन करताना तोफ आढळून आली आहे.
भरतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या पुरातन वाडयाजवळ साफसफाईसाठी उत्खनन करताना ही तोफ आढळून आली आहे
ही तोफ सुमारे तीन फूट लांबीची असून तिचा मागील भाग काहीसा तुटलेला आहे. तसेच ही तोफ ओढून नेण्यासाठी असणारीही चाकंही तुटलेली आहेत.
सुमारे 70 किलो वजनाची ही तोफ 13 व्या किंवा 14 व्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
काही वर्षांपूर्वी भरतगड किल्ला येथे पुरातत्व विभागातर्फे साफसफाईसाठी उत्खनन करण्यात आले होते.
त्यावेळीही या ठिकाणी एक तोफ आणि तोफेचे गोळे आढळले होते.