आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या ऑलराउंडर वनडे रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी नंबर ठरला आहे.
मोहम्मद नबी याने बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अस हसन याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. नबीच्या नावावर 314 रेटिंग्स आहेत. तर शाकिबच्या नावावर 310 रेटिंग्स आहेत.
तर टेस्ट ऑलराउंडर रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या रवींद्र जडेजा याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. जडेजाच्या नावावर 416 आणि अश्विनच्या नावावर 326 रेटिंग्स आहेत. तर शाकिब तिसऱ्या आणि इंग्लंडचा टेस्ट कॅप्टन बेन स्टोक्स चौथ्या स्थानी आहे.
टी 20 ऑलराउंडर्स रँकिंगमध्ये शाकिब पहिल्या स्थानी आहे. शाकिबच्या नावावर 256 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्क्स स्टोयनिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टोयनिसच्या नावावर 217 रेटिंग्स आहेत.
टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मारक्रम आहे. तर वनडेमध्ये नंबर 1 असलेला मोहम्मद नबी हा चौथ्या स्थानावर आहे.