टीम इंडियातून बाहेर असलेला अर्शदीप सिंग आता आयपीएलनंतर नव्या टीमसोबत खेळण्याची तयारी करत आहे. सध्या सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तो केंट काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणार आहे
अर्शदीपच्या 2022 मधील टी-20 विश्वचषकातील नेत्रदीपक कामगिरीमुळे केंटने यावर्षी मार्चमध्ये अर्शदीपला करारबद्ध केले.रविवारी सरे विरुद्ध केंट काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणार आहे.
2021 मध्ये टी20 मध्ये पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. संपूर्ण स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांमध्ये त्याने 15.60 च्या सरासरीने 10 बळी घेतले.
अर्शदीपने 26 टी-20 सामन्यांमध्ये 17.78 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 सामने खेळलेल्या अर्शदीपला अद्याप या फॉरमॅटमध्ये एकही बळी घेता आलेला नाही. अर्शदीपने आयपीएलमध्ये 51 सामन्यात 57 विकेट घेतल्या आहेत.
केंटकडून खेळण्यास उत्सुक असलेल्या अर्शदीप म्हणाला, “इंग्लंडमध्ये लाल चेंडूसोबत क्रिकेट खेळण्यासाठी मी उत्साहित आहे. प्रथम श्रेणी सामन्यात माझे कौशल्य सुधारण्यास उत्सुक आहे. मी केंट संघ आणि त्यांच्या समर्थकांसमोर कामगिरी करण्यास उत्सुक आहे.