क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही महिने हे खास असणार आहेत. चाहत्यांना आशिया कपनंतर वर्ल्ड कपचा थरार अनुभवता येणार आहे.
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहेत.
आशिया कपसाठी टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहे. तसेच नेपाळ क्रिेकट टीमचाही ग्रुप ए मध्ये समावेश आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी इथे खेळवण्यात येणार आहे.
या महामुकाबल्याआधी पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याने टीम इंडियाला थेट वॉर्निंग दिली आहे.
बाबर नुकताच लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळला. आता बाबर अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिज खेळत आहे.
"मी श्रीलंकेत काही दिवसांपासून आहे. त्यामुळे मला घरीच असल्यासारखं वाटतंय", असं बाबर आझम यांनी स्पष्ट केलं.
"टीम इंडियाने आम्हाला कमी लेखू नये. आम्ही श्रीलंकेतही टीम इंडियाला कडवी झुंज देऊ शकतो", असा इशारा बाबरने दिला.