टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे.
ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे.
बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.
ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडेत प्रतिनिधित्व केलंय.
तसेच ऋतुराज टीम इंडियाकडून 9 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय.
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.