बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह यांनी गेल्या काही वर्षात आपली छाप सोडली आहे. भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत.
जय शाह यांची बीसीसीायच्या सचिवपदी 2019 साली नियुक्ती करण्यात आली. जय शाह यांना बीसीसीआयकडून सचिव पदासाठी किती वेतन मिळतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह बीसीसीआयकडून सचिव पदासाठी कोणत्याही प्रकारे वेतन घेत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार जय शाह यांचं नेटवर्थ हे 100 कोटींपेक्षा अधिक आहे.
जय शाह हे उद्योगपती आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह हे टेम्पल इंटरप्रायजेसचे डायरेक्टर गोते. मात्र टेम्पल इंटरप्रायजेसचा 2016 मध्ये बाजार उठला. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांची कुसुम फिनसर्वमध्ये 60 टक्के भागीदारी असल्याचं म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह हे निरमा विश्वविद्यालयातून बी टेकची पदवी घेतली आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचं नेटवर्थ हे 125-150 कोटी असल्याचं म्हटलं जातं.
जय शाह हे एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत.